Sunday, October 24, 2010

दुधरुपी विशावर 'कृष्णनजर'

जिल्ह्यात दुध भेसळीने उच्छाद मांडला आहे. दुधासारख्या पवित्र गोष्टीचा कधी असा व्यापार होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. दुध भेसळ करणाऱ्या पोलिसांना अशी कार्यवाही करण्याचा अधिकार नाही. असा युक्तिवाद काल श्रीरामपूर येथे एका वकील महोदयांनी केला. त्यांचे म्हणणे कायद्याच्या चौकटीत बसणारे असले तरी ते... माणुसकीला धरून मुळीच नाही. एखाद्या वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी कशाला हवी कायद्याची चौकट. राजकारण्याचे पाठबळ असणाऱ्या दुध माफियांविरुद्ध कोणीच कार्यावाही करत नसताना जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी दाखवलेले सामर्थ्य स्तुतीस पात्र आहे. द्वारकेच्या कृष्णाचेच रूप सध्या त्यांनी धारण केलेले दिसत आहे, असे वाटते. तेव्हा जिल्ह्यातील तमाम जनतेचे हित राखणाऱ्या अश्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.